GENUINE AND CERTIFIED PRODUCTS
CASH ON DELIVERY, EASY RETURN

मातीतली भटकंती

शहरातला जन्म, शहरातल्या चालीरीती सर्व काही शहराप्रमाणे. जन्मापासून मृत्यूपर्यन्त सर्व काही यांत्रीक. नळ फिरवला पाणी येत, बटण दाबल पंखा चालू होतो.अलीकडे तर बटण ही दाबाव लागत नाही बसल्या जागेवरून रिमोट ने पंखा चालू होतो आणि गरागरा फिरून गार गार वारा देतो.

सर्व काही यांत्रिक आणि ह्या यांत्रिक दुनियेत जगणारे आपण. जगायला मजा येते पण मानसिक सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड वेगळी असते.
आवडणाऱ्या गोष्टी शनिवार-रविवार ह्या जगमान्य मजा करण्याच्या दिवशी करत प्रत्येक जण त्यांच्या प्रमाणे ही मानसिक सुख मिळवण्याची मजा घेत असतो.
शहरी जीवन जगता जगता क्षीण येतो पण आपण सर्व एका मातीशी जोडलेलो असतो ह्याचा विसर पडतो. खरी मजा, खर सुख ह्या मातीत जाऊन तिथे गोष्टी अनुभवण्यात असते.

आपल्या मातीत भटकंती करण्यात जी मजा आहे ती जगात कुठेच नाही. महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा आपला आहे आणि तिथे जाऊन भटकण्यात आपलेपणा आहे. वेगवेगळे लोक, वेगवेगळी संस्कृती सर्व काही तुम्हाला इथेच मिळेल आपल्याच मातीत आपल्याच महाराष्ट्रात.
साल्हेरी च्या बागलाण प्रातांत डोंगऱ्यादेवाला पुजणाऱ्या आदिवासी जमातीपासून ते तळ कोकणात शिमग्याला पालखी घेऊन नाचणाऱ्या पर्यंत सर्व काही अनुभवायला तुम्हाला ह्याच मातीत मिळेल.
नवीन संस्कृती, नवीन शब्द आणि बरच काही आपल्याला नवीन बघायला आणि अनुभवायला मिळत ते ह्याच भटकंतीतून.

वरील फोटो मध्ये एक लाकडी कपडे धुवण्याच्या आकाराच काही तरी दिसत आहे. मजा अशी आहे की त्याचा वापर कपडे धुवण्यासाठी नाही तर घरातली जमीन समतल करण्यासाठी वापर होतो. वस्तू एकच पण नावं मात्र वेगवेगळी आणि ते ही भागाप्रमाणे. काही ठिकाणी त्याला चोपणी, चोपाटणं तर काही ठिकाणी मोगरी , धोपाटणं,चोपना, पेटणं आणि भुरावणं अस संबोधलं जात.
वस्तू एकच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातले शब्द वेगवेगळे. हे सर्व काही आपल्याला फक्त आणि फक्त समजत मातीतल्या भटकंतीतून…… ?

फोटो स्थळ- कोकण, Published on June 10, 2018 by विश्व सह्याद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *