GENUINE AND CERTIFIED PRODUCTS
CASH ON DELIVERY, EASY RETURN

माडी बुरुज

मराठा आरमाराचा आधारस्तंभ विजयदुर्ग आणि ह्याच अभेद्य दुर्गाची अभेद्यता मराठा आरमाराचा कणा होता. विजयदुर्ग आजही अभेद्य असा उभा आहे. सुस्थितीत असणारे तट , बुरुज , दरवाजे मनाचा ठाव घेतात पण ह्या सर्वांमध्ये माडी बुरुज भलतेच उठून दिसतात.
तसे बघता माडी म्हणजे स्वतंत्र अशी वास्तू ज्याला आपण गढी सुद्धा बोलू शकतो. संरक्षणासाठी केलेली जागा पण, विजयदुर्गावर असलेले माडी बुरुज म्हणजे खालच्या मुख्य तटापासून पाच फूट आत बुरुजावर बांधलेली वास्तू आहे. साधारण २-३ मजली ही इमारत असते. असे ६ माडी बुरुज इथे आहेत. माडी बुरुजातून मुख्य तटबंदी तसेच बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
सर्व माडी बुरुज हे जमिनीच्या बाजूला आहेत ज्याने गडाच्या अभेद्य असण्यात कोणतीही शंका राहत नाही.
पुढच्या वेळेस भेट द्याल तेव्हा अगदी निरखून बघा हे माडी बुरुज. Published on June 10, 2018 by विश्व सह्याद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *